पोस्ट्स

सामाजिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"माझा बाप फुलं देतो… भक्त देवाला चढवतात… मग पुण्य कुणाला मिळतं?" ! एक खरखुरे वास्तव

इमेज
  झेंडूचा सडा आणि TRP ची पूजा गोष्ट फार जुनी नाहीच. 2016 चे साल होते.दसऱ्याची  सुट्टी असल्याने आम्ही टीव्ही लाऊन बसलो होतो .   पंकजा मुंडेंनी भगवान गडावरचा होणारा दसरा सोडून सावरगावात मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. आणि लगेचच विरोधकांच्या गिरणीत नव्या पीठाचं दळण सुरू झालं. राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळा मसाला मिक्स करून टीव्ही वाल्यानी थेट  खिचडीच लावली. गडावर काय होणार? गडाखाली काय घडणार ?     पंकजाताईंच्या भाषणात किती आणि कसं बोलणार! याचीही आकडेवारी कॅमेरावाले मोजत होते. कोणत्या पायऱ्यांनी कोण वर जाणार हे पण सांगत होते  — जणू देशाचं भवितव्य त्या पायऱ्यांवर लटकलेलं होत ! मंडळी तयारीला लागली. पण मेळाव्याच्या भाषणांची काळजी महंत, कार्यकर्ते, पक्षांना कमीच, आणि टीव्हीवाल्यांनाच  जास्त होती . त्यांच्या डोळ्यात "लाइव" ची  सोनेरी फ्रेम चमकत होती — नेमका त्याच टायमाला माझा भाऊ नागपुरात,अन बाप पुण्यात होता — पुण्यांच्या  व्यवहारात मग्न असलेला बाप भक्तांसोबत फुलांचा सौदा करत, रस्त्यावर फुलं मोजत बसला होता , पण त्याच्या हातात फक्त ...

राज-समाजकारणातील हे दोन दादा नक्की आहेत तरी कोण ?

इमेज
  बहुजन विचार चळवळीतील काही नावे ही फक्त नावं नसतात – ती ध्वजासारखी फडकत असतात, ज्याखाली अनेक पिढ्यांचा संघर्ष, वेदना, आणि प्रेरणा एकवटलेली असते. त्यातलीच दोन नावं – प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आखरे . अलीकडेच अक्कलकोट येथे प्रविणदादांवर झालेला शाईफेक प्रकार – हा केवळ एका माणसावरचा हल्ला नव्हता. हा हल्ला होता एका विचारावर , एका चळवळीवर , आणि लोकशाहीत मतभेदाला उत्तर देण्याऐवजी तोंड दाबून बसवण्याच्या कुजक्या वृत्तीवर . अर्थात, ज्यांना विचारांच्या रणांगणात हरायची भीती असते, तेच अशा गलिच्छ पद्धती वापरतात. बहुजन विचार चळवळीतील अतिशय आदराने घेतली जाणारी दोन नावे .. प्रविणदादा गायकवाड  आणि  मनोजदादा आखरे   अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर घडलेला शाईफेक प्रकार ही केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर एका विचारधारेवर कुजक्या विचार धारेतून घडलेली घटना. या घटनेने  अनेकांना मनस्ताप दिला ., पण त्याहून मोठं आश्वासन देणारी बाब म्हणजे – आज त्या दोन झंझावातासारख्या नेतृत्वकर्त्यांची एकत्रित भेट झाली ती पुण्यात ! होय, आम्ही बोलतोय ते  प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आ...

सत्तेतील मोकाट "कलाकारांना" कोण आवरणार? पटतंय का पहा! गजानन खंदारे

इमेज
पटतंय का पहा! नाही तर सोडून द्या.. आजच्या न्यूज चॅनेल्सनी स्वतःचा  एक ठराविक साचा तयार करून घेतला आहे – कुणी कोणाला काय बोललं, कोण कुणाला ढकललं, कोण रुसला, कोण फुगला, कसा फुटला, कोणत्या भाषणात कोणत्या मसाल्याचा वास जास्त आला – एवढंच! देशभर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, आरोग्य व्यवस्था यांसारखे खरे प्रश्न डोंगराएवढे वाढलेले असताना, टीव्हीवर मात्र "मोठे मुद्दे,खोटे मुद्दे" म्हणजे केवळ राजकीय बाचाबाचीचे थरारक सोहळे. खऱ्या समस्या तर बातम्यांच्या बुडाशी पण  दिसत नाहीत. काल वृत्तपत्रात दोन बातम्या डोळ्यात भरल्या. पहिली बातमी – “वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा!” दुसरी – “रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट गुरांचा त्रास वाढला!” (काल कुणीतरी सांगत होते ,हल्ली शेतातल्या वन्य प्राण्यापेक्षा गावातल्या कुत्र्यांचा उपद्रव खूपच वाढलाय म्हणे !रात्र भर कलागत  करून विव्हळत असतात म्हणे ..रात्री ती अन दिवसा channel वरील ..आम्ही निजायचं कसं !) आता ह्या मागण्या नवीन नाहीत. कधी माकडांचा उच्छाद, कधी डुकरांची घाण, कधी भटक्या कुत्र्यांचे टोळके –असते , प्रत्येक वेळी प्रश्न तोच, मागणी तीच,  स...

तुमचं कुटुंब,मुले व तुम्ही सुद्बा मोबाईलच्या कैदेत? हा vdo तुम्हाला जागं करेल !

इमेज
    साधारणतः 20-22 वर्षांपूर्वी  " करलो दुनिया मुट्ठी मे " ही जाहिरात अनेकांना भुरळ घालून गेली. संपूर्ण जग आपल्या हातात येणार म्हणून आपण सर्वांनीच मोबाईल स्विकारला. मात्र मुळे जग जसजसे जवळ  येऊ लागले तसंतसें नात्यातील भावनिक गुंता अधिक वाढू लागला.   मोबाईलमुळे जग जवळ आलं खरं, पण घरातली माणसं दूर होत गेली... एकाच खोलीत राहूनदेखील संवाद हरवला, नजर चुकवली, आणि नात्यांतलं ऊबट पणं वाढत गेलं. आपल्याच माणसांपासून आपण किती दूर गेलो एकाच घरात राहून देखील, नात्यांमध्ये अंतर कसं  वाढलं.हे आमचं आम्हालाच कळले नाही . स्क्रीनच्या प्रकाशात चेहऱ्यांवरची काळजी दिसेनाशी झाली, आणि आपण न बोलता तुटलो  हे आपल्याला उशिरा समजलं !                                                   या ‘चांगलं की वाईट’ याच्या नादात, आपली नैतिकता हरवली,  आपली संस्कृती गडप झाली,  आणि ‘शिकवायला घातलेली  मुलं – आज मोबाईलच्या जाळ्यात अडकून व्यसनांच्...

बच्चू कडूंच्या आंदोलनाने सरकारला हलवलं, पण शेतकऱ्यांना काय मिळालं?

इमेज
  कर्जमाफीच्या प्रतीक्षेत महाराष्ट्र – बच्चू कडूंच्या आंदोलनाने सरकारला हलवलं, पण शेतकऱ्यांना काय मिळालं? महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा नवीन नाही. पण निवडणुकांच्या दरम्यान दिली गेलेली आश्वासने, सरकार स्थापन झाल्यानंतर चार महिने उलटूनही अमलात न आल्याने, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. हेच अस्वस्थतेचे रुपांतर आक्रोशात करण्याचं काम केलं….बच्चू कडू यांनी! .. 2024 मध्ये तेलंगणा सरकारने 2 लाखांपर्यंतची थेट कर्जमाफी जाहीर केली. महाराष्ट्रातही त्यानंतर 3 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची मागणी अधिक तीव्र झाली. महायुती सरकारनेही निवडणुकीच्या आधी 'पूर्ण कर्जमाफी'चं आश्वासन देत मतं खेचली. पण सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटले तरी कर्जमाफीसंदर्भात कोणतीही ठोस योजना जाहीर झालेली नाही. तीन तोंडाचे सरकार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, "सध्या कर्जमाफी शक्य नाही – 31 मार्चपूर्वी कर्ज भरा." दुसरीकडे फडणवीस म्हणतात, "कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत आम्ही सकारात्मक आहोत." आणि एकनाथ शिंदे वारंवार म्हणतात, "सरकार लवकरच निर्णय घेईल." शेतकऱ्याच्या मदतीच ढोंग...नव्...

साहेब! भिक नको, पण कार्यकर्ते आवरा!

इमेज
साहेब! भिक नको, पण कार्यकर्ते आवरा ✍️ पटतंय का पहा! Click on Image " नुसतं बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही आणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही." निवडून येऊन पदावर असणं म्हणजे व्यक्ती विशेष होणं नव्हे. लोकसेवक म्हणून जबाबदारी पार पाडणं ही मदत नसून कर्तव्य आहे, हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. सामान्य माणूस रक्त आटवून मिळवलेल्या पैशातून 18 ते 30 टक्के कर भरतो, ही त्याची सक्तीची जबाबदारी असते. त्या करातून लोकहिताच्या योजना राबवाव्यात, ही अपेक्षा रास्त आहे. पण प्रत्यक्षात सरकार या पैशांचा वापर कसा आणि कुठे करते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. 2007-08 मध्ये शेतमाल आणि वैरणीच्या सूड्या जळण्याच्या घटना खूप वाढल्या होत्या. त्यावेळी स्व. आमदार सुभाष झनक यांच्याशी माझा संवाद होता. मी बातमी लिहिली. साहेबांनी चौकशी केली आणि मी एक सुचवलेली योजना पुढे ठेवली — गावातल्या प्रत्येकाने ५०-१०० रुपये दिले, तर १० हजारांचं नुकसान भरून निघू शकतं. साहेबांनी लगेच आपल्या मानधनातून मदतीची घोषणा केली — शेतमालासाठी ₹५,००० आणि वैरणीसाठी ₹१,०००. ही मदत गावोगावी पोहोचली आणि इतरांनाही प्रेरणा झाली. या पार्श्...

यवतमाळ वाशिम: महायुतीत ताणतणाव नेमकी संक्रातीची कर कोणावर!

इमेज
.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आल्याने ही खेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांची कोंडी करण्याचा उद्देश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गवळी यांची कोंडी करण्यामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जाऊ लागले. महायुतीच्या मेळाव्यात भाजप, मित्रपक्ष  शिवसेना  (शिंदे गट), राष्ट्रवादी  काँग्रेस  (अजित पवार गट), प्रहार, रिपाईं (आठवले गट) आदी सर्व पक्षाचे नेते, इन्पदाधिकारी सहभागी झाले होते. पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली. या मतदारसंघात पुसद, दिग्रस हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ बंजाराबहुल आहेत. यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघातून कुणबी-मराठा समाजाच्या भावना गवळी गेली १५ वर्षे शिवसेनेच्या खासदार आहेत. राज्यात राजकीय समिकरणे बदलल्यानंतर खासदार भावना गवळी या शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्या. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी या मतदारसंघात आपल्या उमदेवारीचा दावा केला आहे. मात्र महायुती...

लग्न बाजारात नोंद करायची, हे बाई काय म्हणतात ऐकाच!

इमेज
व्हाट्सअप युजर्स ना आता धक्का, हे फीचर्स मिळणार नाही फुकट! मोजावे लागतील पैसे मेटाच्या मालकीचे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवीन      वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणण्याच्या प्रयत्नात असते. या अ‍ॅपवर अनेक युजर्स दररोज एकमेकांना मेसेज पाठवत असतात. काही युजर्स चॅट, फोटो, व्हिडीओ बॅकअप घेतात. हे बॅकअप गूगलच्या ड्राइव्ह स्टोरेजवर सेव्ह असते; पण आता ही बॅकअपची सेवा अधिक काळ मोफत नसेल. त्यासाठी युजर्सला या वर्षात पैसे मोजावे लागू शकणार आहेत. मेटाच्या मालकीचे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवीन वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणण्याच्या प्रयत्नात असते. या अ‍ॅपवर अनेक युजर्स दररोज एकमेकांना मेसेज पाठवत असतात. काही युजर्स चॅट, फोटो, व्हिडीओ बॅकअप घेतात. हे बॅकअप गूगलच्या ड्राइव्ह स्टोरेजवर सेव्ह असते; पण आता ही बॅकअपची सेवा अधिक काळ मोफत नसेल. त्यासाठी युजर्सला या वर्षात पैसे मोजावे लागू शकणार आहेत. अनेकदा स्टोरेज Full झाले की, आपण अतिरिक्त एमबीचे फोटोज डिलीट करतो...

लोण सेटल करताय सावधान! नंतर आयुष्य भर.. पहा मजकूर

इमेज
  कर्ज घेतो, कर्जाचे हप्ते थकतात व्याज दंड व्याज पेनल्टी ई ने कर्जाचा आकडा फुगतो आणि अशावेळी बँक किंवा पतसंस्था आपल्याला सूट देते सूट तुमच्या आयुष्याचे नुकसान करून जाते 👉 फोटो खालिल निळ्या अक्षरावर क्लिक करा या मजकुराची माहिती साठी येथे क्लिक करा स्व.आप्पासाहेब जन माणसातील शिक्षण महर्षी                                                                  गजानन खंदारे मोप  शिक्षण महर्षी आप्पासाहेब सरनाईक जगात अनेक माणसे जन्माला येतात आणि जातात मात्र यातील काही व्यक्ती आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा घेऊन कायम आपल्यातच राहत असतात ते त्यांनी आयुष्यात कमावलेल्या कर्मयोगाच्या जोरावर.... सध्याच्या वाशिम जिल्ह्यातील अशीच एक व्यक्ती आजही शिक्षणासारखा समृद्ध वारसा घेऊन आपल्या कार्यकर्तुत्वाने तुमच्या आमच्या कायम स्मरणात आहे ती व्यक्ती म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब सरनाईक त्यांची आज पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन कर...

मुली व पालकांच्या या तिन अपेक्षा मुळे लग्न जुळत नाहीत

इमेज
मुलींच्या किंवा त्यांच्या पालकांच्या या तीन अपेक्षांमुळे तरुण मुलांची लग्न जमत नाहीत.  असं तरुण मुलं म्हणतात.  मात्र या मागचं खरं वास्तव काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. तरुण मुलं म्हणतात की, मुलींच्या आणि विशेषता त्यांच्या पालकांच्या अपेक्षा भयंकर वाढलेल्या आहेत.  ‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांत सारं जग सामावलेलं असतं.  त्यामुळे अनेकदा मुलीच नकार देतात.  मात्र तरीही ढोबळमानानं मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या 3 अपेक्षा असतात असं आम्हाला मराठा लग्न अक्षता मध्ये काम करताना दिसून आलं. मुलाचं स्वतर्‍च्या मालकीचं घर हवंच. शहरात उत्तम पगाराची नोकरी हवी,  शहरातच घरही हवं. मात्र सोबत गावाकडे भरपूर शेती पण हवी.  शक्यतो कुटुंब छोटंच हवं. लग्नानंतर कुटुंबीयांची जबाबदारी घ्यायला नका आता ही एक बाजू झाली. आजही लग्नासाठी योग्य असलेली मुले ही ग्रामीण भागात राहतात आणि ग्रामीण भागातील लोकांची नाळ अजूनही आपल्या संस्कृती परंपरेचे शेतीशी आणि मातीशी जोडलेली आहे. आजच्या काळात लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा काही प्रमाणात वाढल्यात असं म्हणणं खरं ठरू शकतं — पण यामागे अनेक सामाजिक, शै...