पोस्ट्स

फायनान्स लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चला आता "आजपासून एक नवा नियम! "

इमेज
 आठवतय का पहा ! २०१६ : रांगेतली  नोटबंदी सामान्य माणसाच्या कुटुंबातला कर्ता माणूस  जर घरातल्या कुणालाही न सांगता एखादा ‘धाडसी’ निर्णय घेतो आणि तो निर्णय अंगलट येतो, तर आपल्या  घरातल्या सिनेमाचं कथानक ठरलेलं असतं... अख्खं कुटुंब त्याच्यावर तुटून पडतं – "विचार नाही, पुस नाही, व्यवहार नाही… घातलंस ना घर पाण्यावर!" टोमण्यांचा भडिमार सुरू होतो. कदाचित ! त्याच्याकडून घरखर्चाच्या हिशोबाची पाटी काढून घेऊन कारभारी पण  बदलला जातो . पण याच प्रकारचं धाडस जर  कुठलाही सार्वजनिक संवाद न करता,  देशाच्या कारभाऱ्याने केलं, आणि देशातल्या १३५ कोटी लोकांना एकाच झटक्यात “चला, आता नवीन नियम” असं जाहीर करून वेठीस धरलं,  तर काय होतं? तर  त्याचे परिणाम तुम्ही आम्ही सर्वच भोगले  आहेत  .तेव्हा तुम्ही आम्ही   थोडा भूतकाळ आठवून, ,चाचपून बघायला हरकत नसावी . २०१६ – नोटबंदीचा प्रयोगशाळा दिवस ८ नोव्हेंबर २०१६. संध्याकाळी टीव्हीवर देशाचे कारभारी आले, गोड हसू देत जाहीर केलं — “आजपासून ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा कायदेशीर राहणार नाहीत.” भ्रष्टा...