राज-समाजकारणातील हे दोन दादा नक्की आहेत तरी कोण ?
बहुजन विचार चळवळीतील काही नावे ही फक्त नावं नसतात – ती ध्वजासारखी फडकत असतात, ज्याखाली अनेक पिढ्यांचा संघर्ष, वेदना, आणि प्रेरणा एकवटलेली असते.
त्यातलीच दोन नावं – प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आखरे.
अलीकडेच अक्कलकोट येथे प्रविणदादांवर झालेला शाईफेक प्रकार – हा केवळ एका माणसावरचा हल्ला नव्हता. हा हल्ला होता एका विचारावर, एका चळवळीवर, आणि लोकशाहीत मतभेदाला उत्तर देण्याऐवजी तोंड दाबून बसवण्याच्या कुजक्या वृत्तीवर.
अर्थात, ज्यांना विचारांच्या रणांगणात हरायची भीती असते, तेच अशा गलिच्छ पद्धती वापरतात.
बहुजन विचार चळवळीतील अतिशय आदराने घेतली जाणारी दोन नावे ..प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आखरे
अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर घडलेला शाईफेक प्रकार ही केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर एका विचारधारेवर कुजक्या विचार धारेतून घडलेली घटना. या घटनेने अनेकांना मनस्ताप दिला ., पण त्याहून मोठं आश्वासन देणारी बाब म्हणजे – आज त्या दोन झंझावातासारख्या नेतृत्वकर्त्यांची एकत्रित भेट झाली ती पुण्यात !
होय, आम्ही बोलतोय ते प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आखरे यांच्या भेटीबद्दल. ही केवळ एक औपचारिक भेट नव्हती – ही होती एका चळवळीतील नात्यांची, संघर्षातील एकतेची, आणि नव्या दिशेने पुढे जाण्याच्या निर्धाराची साक्ष!
मनोज आखरे यांचे एक वक्तव्य अगदी स्पष्ट आणि थेट हृदयाला भिडणारे आहे –
"आमचा जन्म संघर्षात झाला, कठीण परिस्थितीत एकत्र येऊन, एकमेकांना साथ देऊ, त्यातून अधिक मजबूत आणि एकसंघ होऊ..."
या एका वाक्यात संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण प्रवासाची आणि कार्यपद्धतीची झलक स्पष्ट दिसते.
या चळवळीचे नेते कोणत्याही प्रतिष्ठेच्या खुर्चीवर बसण्यासाठी एकत्र आलेले नाहीत, तर समाजाच्या विवेकाच्या रक्षणासाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, आणि छत्रपती शिवरायांच्या विचारधारेचा जागर करणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी जमले आहेत.
प्रविण गायकवाड यांना काळं फासणं हा अपघात नव्हता तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यपद्धती, विचारसरणी आणि दडपशाहीविरुद्ध उभ्या राहणाऱ्या लोकशाही आवाजावर थुंकी फेकण्याचा सडक्या मानसिकतेचा प्रयत्न होता. पण, इतिहास साक्ष आहे – या संघटनेने अनेकदा अपमानाचे डाग सन्मानात रूपांतरित केले आहेत.
प्रसंगानुसार बाप बदलणाऱ्यानी लक्षात घेतलं पाहिजे ज्या ठिकाणी दोन दादा एकत्र बसले आहेत, ती खुर्ची नाही तर विचारांची रणभूमी आहे.
या भेटीत संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे सर आणि प्रदेश संघटक अभिमन्यू पवार यांची उपस्थिती म्हणजे ही एक विचारांची बैठक होती, केवळ फोटोसेशन नव्हे. ही बैठक, ही शांतता, आणि हे समर्पण यावरून स्पष्ट होतं की, आगामी काळात संभाजी ब्रिगेडची चळवळ केवळ अधिक तेजस्वी, व्यापक आणि परिणामकारक होणार आहे.
एखाद्यावर शाई फेकली जाऊ शकते, पण विचारांवर नाही. संभाजी ब्रिगेड ही चळवळ आहे – विचारांचा, आत्मसन्मानाचा, ऐतिहासिक अन्यायाविरोधात उभ्या ठाकलेल्या समृद्ध पिढीचा नव्या विचाराचा सशक्त वारसा आहे .
आज दोन दादा एकत्र बसले आहेत ते अधिक सशक्त आणि परिपक्व नेतृत्व उभं करण्यासाठी
जय जिजाऊ!
जय शिवराय! जय भिम जय फुले शाहु .....!!
देश कि ब्रिगेड| संभाजी ब्रिगेड!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा