पोस्ट्स

लग्न लेबलसह पोस्ट दाखवत आहे

यवतमाळ वाशिम: महायुतीत ताणतणाव नेमकी संक्रातीची कर कोणावर!

इमेज
.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आल्याने ही खेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांची कोंडी करण्याचा उद्देश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गवळी यांची कोंडी करण्यामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जाऊ लागले. महायुतीच्या मेळाव्यात भाजप, मित्रपक्ष  शिवसेना  (शिंदे गट), राष्ट्रवादी  काँग्रेस  (अजित पवार गट), प्रहार, रिपाईं (आठवले गट) आदी सर्व पक्षाचे नेते, इन्पदाधिकारी सहभागी झाले होते. पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली. या मतदारसंघात पुसद, दिग्रस हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ बंजाराबहुल आहेत. यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघातून कुणबी-मराठा समाजाच्या भावना गवळी गेली १५ वर्षे शिवसेनेच्या खासदार आहेत. राज्यात राजकीय समिकरणे बदलल्यानंतर खासदार भावना गवळी या शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्या. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी या मतदारसंघात आपल्या उमदेवारीचा दावा केला आहे. मात्र महायुती...