तुमचं कुटुंब,मुले व तुम्ही सुद्बा मोबाईलच्या कैदेत? हा vdo तुम्हाला जागं करेल !
साधारणतः 20-22 वर्षांपूर्वी " करलो दुनिया मुट्ठी मे " ही जाहिरात अनेकांना भुरळ घालून गेली.
संपूर्ण जग आपल्या हातात येणार म्हणून आपण सर्वांनीच मोबाईल स्विकारला.
मात्र मुळे जग जसजसे जवळ येऊ लागले तसंतसें नात्यातील भावनिक गुंता अधिक वाढू लागला. मोबाईलमुळे जग जवळ आलं खरं, पण घरातली माणसं दूर होत गेली... एकाच खोलीत राहूनदेखील संवाद हरवला, नजर चुकवली, आणि नात्यांतलं ऊबट पणं वाढत गेलं. आपल्याच माणसांपासून आपण किती दूर गेलो एकाच घरात राहून देखील, नात्यांमध्ये अंतर कसं वाढलं.हे आमचं आम्हालाच कळले नाही . स्क्रीनच्या प्रकाशात चेहऱ्यांवरची काळजी दिसेनाशी झाली, आणि आपण न बोलता तुटलो हे आपल्याला उशिरा समजलं ! या ‘चांगलं की वाईट’ याच्या नादात,
आपली नैतिकता हरवली, आपली संस्कृती गडप झाली, आणि ‘शिकवायला घातलेली मुलं –
आज मोबाईलच्या जाळ्यात अडकून व्यसनांच्या उंबरठ्यावर उभी आहेत.
मोबाईलने शिक्षणाच्या नावाखाली संवाद दिला नाही,
तर चॅटस, स्टेटस आणि फॉलोअर्सच्या नादात गेलेली आमची तरणी पोर पोरी लग्नाच्या भरल्या मांडवातून पळून जात आहेत .आमच्या प्रतिष्ठेची लक्तरे वेशीला टांगत आहेत .
आणि आज आपल्याच हातून
आपल्नया वीन पिढीचा कडेलोट सुरू झालाय... हे नाकारता येत नाही.
मोबाईल शिक्षणासाठी दिला... पण शिक्षणाऐवजी नात्यांचे धडे कुठून सुरु झाले, कळलंच नाही. मुलं-मुली संवादाच्या नावाखाली नात्यांच्या जाळ्यात अडकायला लागलेत... आणि तेव्हा सुरु होतं गुपित प्रेमाचं – लपूनछपून, स्क्रीनच्या आड... पालक होऊन आपण गाफील राहिलो, हे स्वीकारायला हवं. मुलगा किंवा मुलगी सतत कानात हेडफोन, हातात मोबाईल घेऊन गप्प का आहे, हे विचारलं पाहिजे. मोबाईलवर काय सुरु आहे, याची चौकशी केली पाहिजे. फक्त विश्वास नाही, तर योग्य मार्गदर्शन हवं...
हे हि वाचा :कायद्याला हरवणारी बुद्धाची करुणा : click here
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणायचे
All kinds of technologies are in our hands now, but the real challenge is to differentiate what is constructive and what is destructive and choose the right one.
म्हणजेच आज सर्व प्रकारचं तंत्रज्ञान आपल्या हातात आहे, पण खरी कसोटी आहे ती काय विधायक आहे आणि काय विनाशक आहे, हे ओळखणं आणि योग्य पर्याय निवडणं.
मोबाईल शिक्षणासाठी,माहितीसाठी ,मनोरंजनासाठी ,करमणुकीसाठी दिला खरा ... पण शिक्षणाऐवजी वेगळ्याच नात्यांचे धडे कुठून सुरु झाले, कळलंच नाही. मुलं-मुली संवादाच्या नावाखाली नात्यांच्या जाळ्यात अडकायला लागलेत... आणि तेव्हा सुरु होतं गुपित प्रेमाचं लपूनछपून, स्क्रीनच्या आड...
याला प्रेम म्हणायचं कि वासना ! भ्रमित व पथभ्रष्ट करणारीच नव्हे तर आयुष्य उध्वस्त करणारी व्यसनाधीनता !
यातून कित्येकांचे आयुष्य उद्धवस्तहोत आहेत .आत्म्हत्याचेप्रमाण दिवसेदिवस वाढते आहे . पालक म्हणून आपण गाफील राहिलो, हे मान्य करायलाच हवं.
मुलगा-मुलगी सतत हेडफोन कानात, मोबाईल हातात गप्प असतील –
तर 'का?' हा प्रश्न विचारायलाच हवा.
फक्त विश्वास नाही, तर योग्य मार्गदर्शनही हवं.
प्रेमाचं वय आलंय, हे खरंय –
पण ते योग्य वेळ, योग्य दिशा आणि योग्य व्यक्तीसाठी राखून ठेवा."
ऑनलाइन क्लासच्या नावाखाली सुरू होतात व्हॉट्सअॅप चॅट्स,
आणि तिथूनच वाढत जातात गुप्त नात्यांचे गुंते...
शिक्षणासाठी दिलेला मोबाईल, आज अनेक घरांचं टेन्शन बनलाय.
पण दोष फक्त मोबाईलचा नाही,
तर संवाद हरवलेल्या पालकांचाही आहे.
मुलं मोबाईलवर किती वेळ घालवतात, कुणाशी जोडले गेलेत – हे जाणून घ्या.
संवाद वाढवा – नियंत्रणासाठी नव्हे, तर विश्वासासाठी.
कारण मोबाईलवर सुरू झालेलं प्रेम,
कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करतं – हे वेळेत समजून सांगा."
. भाद्रपदात कुत्री महिना भर ध्यानावर नसतात म्हणे…! पण सत्तेतले काही प्राणी तर बारा महिने ‘सीझन’मध्ये असतात..याचा बंदोबस्त वेळीच केला नाही तर कदाचित बेंबीत 14 टोचूनही काहीच फायदा होणार नाही... अधिक वाचा click here
मोबाईल मुळे फोन कॉल, मेसेज, व्हॉट्सअॅप, सोशल मीडियामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माणसाशी क्षणात संपर्क साधता येतो. ऑनलाइन क्लासेस, ई-बुक्स, शैक्षणिक अॅप्समुळे शिक्षण सर्वत्र उपलब्ध झालं आहे ऑनलाइन बँकिंग, UPI, गुगल पे, फोन पे यामुळे व्यवहार झपाट्याने होतात गाणी, चित्रपट, गेम्स, सोशल मीडिया यामुळे वेळ घालवणं सोपं होतं.
अति वापरामुळे डोळ्यांवर ताण, झोपेचा अभाव, मानदुखी, स्थूलता, मेंदूवर ताण निर्माण होतो सोशल मीडियावर सतत तुलना, लाइक्स-फॉलोअर्सचा दबाव यामुळे न्यूनगंड, चिंता आणि डिप्रेशन वाढते. घरात एकत्र राहूनही मोबाईलमुळे संवाद हरवतो, माणसं भावनिकदृष्ट्या दूर जातात चुकीचे अॅप्स, ओंन लाईन रम्मी, गेम, फ्रॉड कॉल्स यामुळे आर्थिक फसवणूक होण्याचा धोका यावर एकच उपाय वापरावर मर्यादा ठेवा मोबाईलसाठी वेळ निश्चित करा
पालकांनी नियंत्रण व संवाद ठेवामुलांशी मैत्रीपूर्ण पद्धतीने संवाद साधा. काय पाहतात, वापरतात, याची कल्पना असू द्या. उपयोगी अॅप्स व कंटेंट वापरण्याला प्रोत्साहन द्या शैक्षणिक, प्रेरणादायी, कौशल्यवाढीसाठी वापर केला जावा. आठवड्यातून १ दिवस, किंवा दररोज १–२ तास मोबाईलपासून दूर राहण्याचा संकल्प करा. फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि बाहेर खेळण्यावर भर द्या मुलांना मैदानात खेळायला, मैत्री निर्माण करायला प्रोत्साहित करा. नैतिक व सायबर शिक्षण द्या मोबाईल सुरक्षिततेचे नियम, ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव याविषयी योग्य वयातच माहिती द्या.
आपल्या कॉमेंट म्ह्तावाच्या आहेत
cluster-find
अस्वीकृती सूचना:
वरील लेख/मजकूर केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये दिलेली माहिती ही सर्वसाधारण अनुभव, निरीक्षण, संशोधन व तज्ञ सल्ल्याच्या आधारे मांडलेली आहे. मोबाईल वापरावरील नियंत्रण, संवाद व सल्ला प्रत्येक पालक, विद्यार्थी किंवा व्यक्तीच्या परिस्थितीनुसार वेगळा असू शकतो. कृपया आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घ्या. या लेखातील कोणतीही माहिती कोणालाही दोषी ठरवण्यासाठी किंवा कोणत्याही विशिष्ट तंत्रज्ञानाविरोधात वापरण्याचा उद्देश नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा