आता सर्वच ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सात हजार रुपये. ! काय खरं काय खोटं -दुसरी बाजू

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सात हजार रुपये.. काय आहे योजना?? गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी “लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना राज्यातील महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. याच धर्तीवर आता राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सादर केली आहे. महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. याच धर्तीवर आता राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सादर केली आहे. महाराष्ट्र विधानसभेत आणि विधान परिषदेच्या अधिवेशनात १५ जुलै २०२५ रोजी ‘महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक (सेवा, सुविधा इत्यादी देण्याबाबत) अधिनियम, २०२५’ हे विधेयक मांडण्यात आले. या विधेयकानुसार राज्यातील ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. ही रक्कम महिलांनाही आणि पुरुषांनाही समान प्रमाणात दिली जाणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वृद्ध लोकांना याचा विशेष फायदा होणार आहे. योजनेच्या माध्यमातून ज्य...