आणि त्याच दिशी रात्रीचे बारा वाजण्या पुर्वी नवरा बायकोनी! घरातल्या...
झेंडूचा सडा आणि TRP ची पूजा गोष्ट फार जुनी नाहीच. 2016 चे साल होते.दसऱ्याची  सुट्टी असल्याने आम्ही टीव्ही लाऊन बसलो होतो .   पंकजा मुंडेंनी भगवान गडावरचा होणारा दसरा सोडून सावरगावात मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. आणि लगेचच विरोधकांच्या गिरणीत नव्या पीठाचं दळण सुरू झालं.  राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळा मसाला मिक्स करून टीव्ही वाल्यानी थेट  खिचडीच लावली.  गडावर काय होणार? गडाखाली काय घडणार ?     पंकजाताईंच्या भाषणात किती आणि कसं बोलणार! याचीही आकडेवारी कॅमेरावाले मोजत होते. कोणत्या पायऱ्यांनी कोण वर जाणार हे पण सांगत होते  — जणू देशाचं भवितव्य त्या पायऱ्यांवर लटकलेलं होत ! मंडळी तयारीला लागली. पण मेळाव्याच्या भाषणांची काळजी महंत, कार्यकर्ते, पक्षांना कमीच, आणि टीव्हीवाल्यांनाच  जास्त होती .  त्यांच्या डोळ्यात "लाइव" ची  सोनेरी फ्रेम चमकत होती — नेमका त्याच टायमाला माझा भाऊ नागपुरात,अन बाप पुण्यात होता — पुण्यांच्या  व्यवहारात मग्न असलेला बाप भक्तांसोबत फुलांचा सौदा करत, रस्त्यावर फुलं मोजत बसला होता  , पण त्याच्या हातात फक्त रिकामा ...