यवतमाळ वाशिम: महायुतीत ताणतणाव नेमकी संक्रातीची कर कोणावर!



.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आल्याने ही खेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांची कोंडी करण्याचा उद्देश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गवळी यांची कोंडी करण्यामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जाऊ लागले.

महायुतीच्या मेळाव्यात भाजप, मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), प्रहार, रिपाईं (आठवले गट) आदी सर्व पक्षाचे नेते, इन्पदाधिकारी सहभागी झाले होते. पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली. या मतदारसंघात पुसद, दिग्रस हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ बंजाराबहुल आहेत. यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघातून कुणबी-मराठा समाजाच्या भावना गवळी गेली १५ वर्षे शिवसेनेच्या खासदार आहेत. राज्यात राजकीय समिकरणे बदलल्यानंतर खासदार भावना गवळी या शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्या. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी या मतदारसंघात आपल्या उमदेवारीचा दावा केला आहे. मात्र महायुतीच्या मेळाव्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा)चे आमदार इंद्रनील नाईक यांनी भावना गवळींच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध करीत या मतदारसंघात बंजारा समाजाचा उमदेवार देण्याची मागणी केली आहे. आमदार नाईक‍ यांच्या या मागणीनंतर या मतदारसंघातील उमेदवारी भाजप व मित्रपक्षांसाठी डोकेदुखी ठर इंद्र


यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात
संभाव्य उमेदवारीवरून महायुतीत ताणतणाव असल्याचे आज कार्यकर्त्यांनी अनुभवले. आज रविवारी येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली. त्याचवेळी शिवसेना (शिंदे गट) खासदार भावना गवळी यांनी या मतदारसंघावर आपलाच दावा असल्याचे सांगून ही जागा अन्य मित्रपक्षांना सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत महावादाची शक्यता व्यक्त होत आहे.




आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने निवडणुकीचे रंणशिंग फुंकले आहे. ‘मकरसंक्राती’निमित्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मनोमिलन मेळावा शहरातील एका आलिशान हॉटेलात झाला. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, प्रा.डॉ. अशोक ऊईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाणे, अ‍ॅड. नीलय नाईक, इंद्रनिल नाईक यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षाचे नेते, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते


महायुतीच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची आग्रही मागणी केली. यासाठी त्यांनी लोकसभा मतदारसंघातील बंजारा समाजाच्या स्थितीचा दाखल दिला. शिवाय आताच उमेदवार जाहीर करावा, म्हणजे प्रचार करता येईल अशी मागणी केली. सभागृहात उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजत प्रतिसाद दिला. नाईकांच्या या मागणीने मंचावर उपस्थित इतर मित्र पक्षाच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली.
खासदार भावना गवळी यांनी आमदार नाईकांच्या मागणीचा धागा पकडत आपण या मतदारसंघात पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्याचा दाखला दिला. त्यामुळे येत्या निवडणुकीतही आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला. महायुतीकडे दुसरी महिला कोण? असा प्रश्नही खासदार गवळी यांनी उपस्थित केला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी महिला उमेदवार देण्याची मागणी करीत प्रहारही निवडणूक लढू शकते, असा इशारा दिला.

महायुतीत महा तणाव: vdo साठी क्लिक करा




महायुतीत यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून ताणतणाव; नेमकं काय घडलं? वाचा…
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारीवरून महायुतीत ताणतणाव असल्याचे आज कार्यकर्त्यांनी अनुभवले.


महायुतीच्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची आग्रही मागणी केली. यासाठी त्यांनी लोकसभा मतदारसंघातील बंजारा समाजाच्या स्थितीचा दाखल दिला. शिवाय आताच उमेदवार जाहीर करावा, म्हणजे प्रचार करता येईल अशी मागणी केली. सभागृहात उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजत प्रतिसाद दिला. नाईकांच्या या मागणीने मंचावर उपस्थित इतर मित्र पक्षाच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली.

खा. भावना गवळी विरोधात नियोजित खेळी क्लिक करा

खासदार भावना गवळी यांनी आमदार नाईकांच्या मागणीचा धागा पकडत आपण या मतदारसंघात पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्याचा दाखला दिला. त्यामुळे येत्या निवडणुकीतही आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला. महायुतीकडे दुसरी महिला कोण? असा प्रश्नही खासदार गवळी यांनी उपस्थित केला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी महिला उमेदवार देण्याची मागणी करीत प्रहारही निवडणूक लढू शकते, असा इशारा दिला.


सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या खा. गवळीना या वेळेस मिळणार डच्चु क्लिक करा

खासदार-आमदारांनी दावा केला असला तरी आमदार मदन येरावार तसेच पालकमंत्री संजय राठोड या दोघांनीही या विषयावर बोलण्याचे टाळले. त्यामुळे महायुतीत कोणीही उमेदवारीचा दावा केला तरी प्रत्यक्ष निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचा सूचक इशारा करत या मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे सांगत वादापासून दूर राहणे पसंत केले. निवडणुकीच्या आधी नेते तसेच पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होऊन निवडणुकीला सामोरे जाताना हेवेदावे नसावे हा या मेळाव्यामागचा उद्देश असला तरी मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील हेवेदावे समोर आल्याने आगामी निवडणूक महायुतीसाठीही डोकेदुखीची ठरेल, अशी चर्चा मेळाव्यात रंगली होती.
 (लोकसत्ता वरून साभार)







मित्रांनो जय जिजाऊ

 मराठा लग्न अक्षदा मध्ये आपले स्वागत आहे!

एक मोफत सेवा भाऊ म्हणून असलेल्या मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण दररोज वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो.

तेंव्हा प्ले स्टोर ला जाऊन मराठा लग्न अक्षदा हे ॲप डाऊनलोड करा व बायोडाटा पहा हे पूर्णपणे निशुल्क आहे.

तर मित्रांनो



कुटुंबातील व्यक्तीचा कशानेही मृत्यू झाल्यास मिळतात दोन लाख हे अनेकांना माहीतच नाही.येथे क्लिक करा


एकीकडे लग्न जुळत नाहीत याविषयी आपण सतत ओरडत असतो.

व इतरांना दोष देऊन किंवा मुलींचे पालक भाव खातात.

मुलीला चांगलं घर पाहिजे ,

 सरकारी नोकरी पाहिजे.

शेती पाहिजे...

मग भलेही त्या मुलीला शेतात काम नाही आली तरी चालेल.

मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.


बचत खात्यावर आता व्यवहार मर्यादा खात्यातून कपात होईल टॅक्स.. क्लिक करा


मुली व मुलींचे पालक लग्नासाठी प्रतिसाद देत नाही.

असे आरोप आपण सतत करत असतो.

मात्र असे आरोप करत असताना नेमकी यामागची खरी परिस्थिती काय आहे हे कोणीच जाणून किंवा समजून घेत नाही.

कुणीतरी लग्न जुळत नाहीत म्हणून मोर्चे काढतो वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून याकडे सरकारचं लक्ष वेधतो..

मात्र लग्न अक्षदा मध्ये काम करत असताना , आम्हाला अनेक अनुभव आलेत,

आई-वडिलांना जेवणात झोपीच्या गोळ्या देऊन ती.. एके दिवशी भयंकर पहा vdo click here

आपण फक्त अपेक्षा ह्या दुसऱ्याकडूनच ठेवतो .स्वतः मात्र स्वतःसाठी किंवा इतरांसाठी काहीच करत नाही हा अनुभव आम्हाला अनेक वेळा आलेला आहे.

काही बोटावर मोजणे इतक्या चांगल्या विवाह संस्था सोडल्या तर विवाह संस्थेच्या माध्यमातून केवळ आणि केवळ फसवणूक होते विवाह संस्थेतून लग्न शक्यतो जुळतच नाहीत.

हे आम्ही वारंवार सांगत असतो.

तरीही लोक पैसे भरून फसतात आणि मग गावभर बोंबलत फिरतात.

विवाह संस्थेच्या भरोशावर न बसता आपणच आपले लग्न जुळवूया.



हजारो अनाथ मुलींची लग्न जुळविणाऱ्या बंटी बबली ची कहाणी  


आपणच आपले एकमेकांचे मध्यस्थ बनवूया.

दलाल आणि विवाह संस्थांपासुन सावध राहण्यासाठी

मित्रांनो खालील लिंक द्वारे आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

आम्ही आपल्याला त्या ग्रुपचे ॲडमिन बनवु.

यातून आपण आपल्या दहा जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना या ग्रुपमध्ये जोडले तर ही संख्या वाढत जाईल आपणच आपले बायोडाटा त्या ग्रुप वर शेअर करू.

यातून बायोडाटातून अनेक बायो डाटा हे आपल्या नात्यातील ओळखीतील परिचयातील असू शकतील.

आणि या माध्यमातून मुला मुलींच्या नातेवाईकात परस्पर संवाद होईल.

व लग्न जुळतील..

गेल्या चार वर्षात आमच्या वाशिम बुलढाणा आणि हिंगोली या जिल्ह्यात गेल्या चार वर्षात 500 पेक्षा अधिक लग्न अशाच पद्धतीने दलाल किंवा विवाह संस्थेच्या मदतीशिवाय जुळले आहे.

तेव्हा जमत असेल तर पहा आणि खालील ग्रुप जॉईन करा आम्हाला वैयक्तिक मेसेज करा

जय जिजाऊ







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व पेढ्यांचा मालक!

मुली व पालकांच्या या तिन अपेक्षा मुळे लग्न जुळत नाहीत