एकाच पावसाने शेती गेली पाण्यात; नेते कुठे? तर फोटोत! पंचनाम्याचे नाटक थांबवा !

एकाच पावसाने शेती गेली पाण्यात; नेते कुठे? तर फोटोत! पंचनाम्याचे नाटक थांबवा ! पटतंय का पहा ! गजानन खंदारे ( रिसोड ) एक दिवस आणि रात्रभर झालेल्या सततधार पावसाने शेतांमध्ये पाणी साचलं, नद्या पात्राबाहेर ओसंडून वाहिल्या आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. पेरणी केलेल्या सर्वच पिकांचं व शेतीच जवळपास शंभर टक्के नुकसान झालं. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभं केलेलं पीक एका रात्रीत उद्ध्वस्त झालं. ही घटना केवळ बातमीपुरती मर्यादित राहिली, तर लोकप्रतिनिधी फक्त पाहणी करून, फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत, सरकारकडे पंचनाम्याची मागणी करत असल्याचं सांगत आहेत. परंतु, धोरण आखणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या या लोकप्रतिनिधींची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी काय आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. 75 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही एका सततधार पावसाने शेतकऱ्यांचं सर्वस्व वाहून नेण्याची परिस्थिती का उद्भवते? हे ही वाचा..नेते की, पत्रक छाप भिकाऱ्याच्या टोळ्या! गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि अनियमित पावसाने शेतीचं नुकसान वारंवार होत आहे. 2020 मध्ये अतिवृष्टी, 2021 मध्ये पूर, 20...