किती सोसतात बिच्चारे हे आमदार! अशांना कोण आवरणार !

आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी आज वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘जेवण सडलेलं होतं, माझी उलटी झाली आणि त्यानंतर मी कँटीनमध्ये जसा होतो तसाच गेलो. कर्मचाऱ्याला समज दिली आणि प्रतिक्रिया दिली. ती माझी शैली होती आणि ती मला मान्य आहे,’’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. संजय गायकवाड यांनी डाळ, भात, चपाती अशी ऑर्डर दिली होती. पण त्यांच्या म्हणण्यानुसार जेवण सडलेले होते. दुसऱ्या घासावर उलटी झाल्यानंतर ते थेट कँटीनमध्ये गेले आणि कर्मचाऱ्याला विचारणा केली. डाळ इतरांना दाखवून सर्वांनी सडलेली असल्याचे मान्य केले, असंही त्यांनी सांगितले. “शिवसेना स्टाईलमध्ये दिलं उत्तर” : ‘‘मी त्याला मराठीत, हिंदीत, इंग्रजीत समजावले. पण तो ऐकत नव्हता. मग मी शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मला याचा पश्चाताप नाही,’’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. विरोधकांनी टीका केली असली तरी ‘‘माझ्या पक्षाच्या किंवा विरोधकांच्या आरोपांची मला पर्वा नाही,’’ असं गायकवाड म्हणाले. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, तिथलं किचन अस्वच...