पोस्ट्स

संत गजानन महाराज संस्थान : सेवाकार्य आणि शिस्तीचा आदर्श

इमेज
संत गजानन महाराज: सेवाकार्य आणि शिस्तीचा आदर्श संत गजानन महाराज यांचे शेगांव येथील समाधी मंदिर आज एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. दररोज हजारो भक्त या पवित्र स्थळी दर्शनासाठी येतात. गजानन महाराज संस्थान ही सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी आहे, आणि त्यांच्या सेवाकार्यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, भक्तांनी केवळ भक्तीच नव्हे, तर संस्थानाच्या शिस्तीचा आणि सेवाकार्याचा आदर्श घेणे आजच्या काळाची गरज बनली आहे. गजानन महाराजांचा हा वारसा अनेक गावांमध्ये त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी जपला जात आहे. "सेवा परमो धर्म" हा मंत्र प्रत्यक्षात आणून आपण त्यांचा खरा आदर्श जपू शकतो. गावोगावी उभ्या राहिलेल्या मंदिरांनी या सेवाभावाचा आणि शिस्तीचा अवलंब करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता आहे. मंदिरांचे सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून महत्त्व गावोगावी मंदिरे ही मोठ्या प्रमाणात उभारली गेली आहेत .मंदिरे हि केवळ धार्मिक स्थळेच नाहीत, तर सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रेही आहेत. गजानन महाराज संस्थानाने आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सेवाक...

कावड यात्रा : भक्ती की मस्ती धार्मिकतेच्या नावाने आमची मुले बिघडतात का?

इमेज
धार्मिकतेच्या नावाने आम्ही बिघडतो आहे का? पटतंय का पहा! ✍  गजानन खंदारे आज श्रावणातील शेवटचा सोमवार. रस्त्यांवर कावड मंडळांची  धूम होती. 10 ते 30 वयोगटातील युवक– एकसारख्या कपड्यात, DJ च्या तालावर थिरकताना दिसले. पावसात न्हाऊन निघालेली ही गर्दी जणू भक्तीने ओथंबली होती!  या गर्दीतून वाट काढतांना माझ्या मित्राच्या छातीत अचानक धडधड सुरु झाली. प्रेशर थोडं वाढल्याने तो बराच अस्वस्थ झाला. डॉक्टरा म्हणाले 85 डेसिबल पेक्षा आवाजाने रक्तदाब आणि अटॅक चा धोका वाढतो. – DJ पासून थोडं लांबच राहा.  अलीकडे असे त्रास अनेकांना जाणवतात.  महिलांना सुद्धा अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. “कावड आपली महाराष्ट्राची परंपरा आहे का? DJ आपली संस्कृती आहे का!”  – मित्र जरा वैतागूनच बोलला. सध...

आणि त्याच दिशी रात्रीचे बारा वाजण्या पुर्वी नवरा बायकोनी! घरातल्या...

इमेज
झेंडूचा सडा आणि TRP ची पूजा गोष्ट फार जुनी नाहीच. 2016 चे साल होते.दसऱ्याची  सुट्टी असल्याने आम्ही टीव्ही लाऊन बसलो होतो .   पंकजा मुंडेंनी भगवान गडावरचा होणारा दसरा सोडून सावरगावात मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. आणि लगेचच विरोधकांच्या गिरणीत नव्या पीठाचं दळण सुरू झालं. राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळा मसाला मिक्स करून टीव्ही वाल्यानी थेट  खिचडीच लावली. गडावर काय होणार? गडाखाली काय घडणार ?     पंकजाताईंच्या भाषणात किती आणि कसं बोलणार! याचीही आकडेवारी कॅमेरावाले मोजत होते. कोणत्या पायऱ्यांनी कोण वर जाणार हे पण सांगत होते  — जणू देशाचं भवितव्य त्या पायऱ्यांवर लटकलेलं होत ! मंडळी तयारीला लागली. पण मेळाव्याच्या भाषणांची काळजी महंत, कार्यकर्ते, पक्षांना कमीच, आणि टीव्हीवाल्यांनाच  जास्त होती . त्यांच्या डोळ्यात "लाइव" ची  सोनेरी फ्रेम चमकत होती — नेमका त्याच टायमाला माझा भाऊ नागपुरात,अन बाप पुण्यात होता — पुण्यांच्या  व्यवहारात मग्न असलेला बाप भक्तांसोबत फुलांचा सौदा करत, रस्त्यावर फुलं मोजत बसला होता , पण त्याच्या हातात फक्त रिकामा ...

शेतकरी आत्महत्या–खरंच कर्जा मुळे होतात का? खरे कारण काय ! तुम्हीही जाणून ...

इमेज
  भारतात शेतकरी आत्महत्या हा केवळ एक आकडा नाही, तर देशाच्या ग्रामीण हृदयावरचा एक खोल जखमेचा ठसा आहे. प्रत्येक वर्षी हजारो शेतकरी शेती सोडून जीवन सोडण्याचा निर्णय घेतात. सामान्यत: या घटनांचे कारण म्हणून नैसर्गिक आपत्ती – दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस,शेती पिकत नाही .इत्यादी   – कारणांचा उल्लेख केला जातो. पण खरंच ही गोष्ट खरी आहे काय ? एवढीच आहे का? कि यामागे इतर कारणे आहेत ..? नैसर्गिक आपत्ती –हे एक कारण , पण एकमेव नाही हवामानातील अनिश्चितता ही नक्कीच एक महत्त्वाची कारणं आहे. पिकांचे नुकसान, उत्पादनात घट, आणि बाजारभाव कोसळणे यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतो. तरीसुद्धा, अनेकदा अशा परिस्थितीतून शेतकरी पुन्हा उभे राहतात. मग काही शेतकरी का नाही?  मानसिक व सामाजिक घटक – शेतकरी आत्महत्येतील लपलेली कारणे शेतकरी आत्महत्येबाबत बोलताना आपण बहुतेक वेळा कर्ज , नैसर्गिक आपत्ती किंवा पिकांच्या भावाचा घसरलेला दर यांवरच लक्ष केंद्रित करतो. पण शेतकऱ्याच्या आयुष्यात असे अनेक मानसिक आणि सामाजिक घटक असतात, जे त्याला टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत ढकलतात.  ...

चला आता "आजपासून एक नवा नियम! "

इमेज
 आठवतय का पहा ! २०१६ : रांगेतली  नोटबंदी सामान्य माणसाच्या कुटुंबातला कर्ता माणूस  जर घरातल्या कुणालाही न सांगता एखादा ‘धाडसी’ निर्णय घेतो आणि तो निर्णय अंगलट येतो, तर आपल्या  घरातल्या सिनेमाचं कथानक ठरलेलं असतं... अख्खं कुटुंब त्याच्यावर तुटून पडतं – "विचार नाही, पुस नाही, व्यवहार नाही… घातलंस ना घर पाण्यावर!" टोमण्यांचा भडिमार सुरू होतो. कदाचित ! त्याच्याकडून घरखर्चाच्या हिशोबाची पाटी काढून घेऊन कारभारी पण  बदलला जातो . पण याच प्रकारचं धाडस जर  कुठलाही सार्वजनिक संवाद न करता,  देशाच्या कारभाऱ्याने केलं, आणि देशातल्या १३५ कोटी लोकांना एकाच झटक्यात “चला, आता नवीन नियम” असं जाहीर करून वेठीस धरलं,  तर काय होतं? तर  त्याचे परिणाम तुम्ही आम्ही सर्वच भोगले  आहेत  .तेव्हा तुम्ही आम्ही   थोडा भूतकाळ आठवून, ,चाचपून बघायला हरकत नसावी . २०१६ – नोटबंदीचा प्रयोगशाळा दिवस ८ नोव्हेंबर २०१६. संध्याकाळी टीव्हीवर देशाचे कारभारी आले, गोड हसू देत जाहीर केलं — “आजपासून ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा कायदेशीर राहणार नाहीत.” भ्रष्टा...

एकाच दोरीला पतीपत्नी लटकतात, सरकारचे काळीज का फाटत नाही?

इमेज
     आपल्या आजूबाजूला दररोज अनेक घटना घडत असतात. काही हृदय पिळवटून टाकणाऱ्या असतात, तर काही अजब-गजब, विस्मयकारक. आपण त्या एक बातमी म्हणून पाहतो, दोन क्षण चर्चा करतो… आणि मग विसरून जातो. नव्या घटना पुन्हा आपल्या नजरेसमोर येतात आणि मागच्या आठवणी पुसून टाकतात. पण एक घटना मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून कायम आपल्या समोर उभी आहे — शेतकरी आत्महत्या . या विषयावर चर्चा होते, भाषणे होतात, आश्वासने दिली जातात. सरकारे बदलली, माणसं बदलली, योजना बदलल्या… पण तोडगा मात्र कधीच बदलला नाही . कर्जबाजारीपणाची, पिकांच्या भावाची, निसर्गाच्या कोपाची, आणि सरकारी निष्क्रियतेची साखळी तशीच राहिली. अशा घटना जागतिक महासत्ता असल्याचा गर्व मिरवणाऱ्या आपल्या व्यवस्थेला लागलेला एक अमिट कलंक आहेत, असे म्हणणे अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. अशीच एक घटना पुन्हा नव्याने समोर आली आहे . दुःखद आणि काळीज पिळवटून टाकणारी हि  घटना — भरोसा गावच्या शेतकरी दाम्पत्याने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश श्रीराम घुंटे आणि रंजना गणेश घुंटे — ही फक्त दोन नावे नाहीत, तर दोन जीवंत हृदयं होती, ज्यांनी ...

फोन पे गुगल पे वापरताय सावधान ! भाजी विक्रेत्याला तब्बल 29 लाखाची GST नोटीस

इमेज
एखाद्या झोपडीत राहणाऱ्या गरिबाला लाखाचे विज बिल !   लातूरच्या एका   शेतकऱ्याला  त्याच्याकडे विहीरच नसताना  ₹90,000 ची पाणीपट्टीची मागणी नोटीस आली.  शेतात विहीरच खोदली  नसताना ती चोरीला कशी जाते यावरचा सिनेमा आपण सर्वांनी पहिलाच असेल. चुकीच्या डिजीटल नोंदीमुळे अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो नंतर प्रशासनाचे खेटे मारल्यावर ह्या चुका काही वेळा दुरुरुस्त पण  होतात पण त्यापुढे  आज एक लीडिंग  बातमी अनेकांचे लक्ष वेधून गेली कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील शंकर गौडा नावाच्या एका भाजी विक्रेत्याला तब्बल  ₹२९ लाखांची जीएसटी नोटीस मिळाल्याने लघु व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यांनी मागील चार वर्षांपासून थेट शेतकऱ्यांकडून भाजी घेत, ग्राहकांना विक्री केली. मात्र, UPI पेमेंटच्या माध्यमातून झालेल्या ₹१.६३ कोटी रुपयांच्या व्यवहारांवर आधारित ही नोटीस आहे.  भाजी विक्रेत्याला २९ लाखाची जीएसटी नोटीस मिळाल्याने खळबळ माजली आहे. मागील ४ वर्षापासून महापालिका मैदानाशेजारी भाजी विक्री करणाऱ्या दुकानदाराला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की डि...

आता सर्वच ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सात हजार रुपये. ! काय खरं काय खोटं -दुसरी बाजू

इमेज
 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सात हजार रुपये.. काय आहे योजना??   गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी “लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना राज्यातील महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. याच धर्तीवर आता राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सादर केली आहे. महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. याच धर्तीवर आता राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सादर केली आहे. महाराष्ट्र विधानसभेत आणि विधान परिषदेच्या अधिवेशनात १५ जुलै २०२५ रोजी ‘महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक (सेवा, सुविधा इत्यादी देण्याबाबत) अधिनियम, २०२५’ हे विधेयक मांडण्यात आले. या विधेयकानुसार राज्यातील ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. ही रक्कम महिलांनाही आणि पुरुषांनाही समान प्रमाणात दिली जाणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वृद्ध लोकांना याचा विशेष फायदा होणार आहे. योजनेच्या माध्यमातून ज्य...