फोन पे गुगल पे वापरताय सावधान ! भाजी विक्रेत्याला तब्बल 29 लाखाची GST नोटीस

एखाद्या झोपडीत राहणाऱ्या गरिबाला लाखाचे विज बिल ! लातूरच्या एका शेतकऱ्याला त्याच्याकडे विहीरच नसताना ₹90,000 ची पाणीपट्टीची मागणी नोटीस आली. शेतात विहीरच खोदली नसताना ती चोरीला कशी जाते यावरचा सिनेमा आपण सर्वांनी पहिलाच असेल. चुकीच्या डिजीटल नोंदीमुळे अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो नंतर प्रशासनाचे खेटे मारल्यावर ह्या चुका काही वेळा दुरुरुस्त पण होतात पण त्यापुढे आज एक लीडिंग बातमी अनेकांचे लक्ष वेधून गेली कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील शंकर गौडा नावाच्या एका भाजी विक्रेत्याला तब्बल ₹२९ लाखांची जीएसटी नोटीस मिळाल्याने लघु व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यांनी मागील चार वर्षांपासून थेट शेतकऱ्यांकडून भाजी घेत, ग्राहकांना विक्री केली. मात्र, UPI पेमेंटच्या माध्यमातून झालेल्या ₹१.६३ कोटी रुपयांच्या व्यवहारांवर आधारित ही नोटीस आहे. भाजी विक्रेत्याला २९ लाखाची जीएसटी नोटीस मिळाल्याने खळबळ माजली आहे. मागील ४ वर्षापासून महापालिका मैदानाशेजारी भाजी विक्री करणाऱ्या दुकानदाराला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की डि...