प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला ,आम्हाला अजिबात खंत किंवा खेद नाही !


संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते  प्रवीण गायकवाड यांच्यावर कालपरवा  अक्कलकोट येथे झालेला हल्ला  केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर विचारांवर झालेला हल्ला होता.
परंतु एक सामान्य नागरिक म्हणून  मला याबद्दल अजिबात खंत वाटत नाही.

कारण आम्ही आधीच अनेक पातळ्यांवर गुलामी स्वीकारली आहे – आणि सगळ्यात मोठं दु:ख म्हणजे, आम्हाला त्या गुलामीची जाणीवच आमच्यात उरलेली नाही.

सरकार, संस्था, किंवा मीडिया जर एखाद्या निर्भीड विचारवंतावर हल्ला करत असेल आणि आपण गप्प बसतो, तर आपण त्या अन्यायात अप्रत्यक्ष सहभागी  होतो.

आज आपण मोबाईल, सोशल मीडिया, धर्म आणि पक्षांच्या घोषणांमध्ये स्वतःचं स्वातंत्र्य शोधतो. पण जेव्हा कोणी ह्या  गुलामगिरीचा बुरखा फाडण्याचा  प्रयत्न करतो  तेव्हा तो संघटना ,व्यक्ती आपल्याला अडचणीचा वाटतो.

म्हणूनच ज्ञानेश  महाराव प्रविण  गायकवाडांसारख्या विचारवंतावर हल्ला होतो, आणि आपल्यातल्याच अनेकांना त्याचं काहीच वाटत नाही 

हा विचार केवळ प्रतिक्रियेचा नाही – तर एक वैचारिक सावधानतेचा इशारा आहे.

“गुलामाला आपलं बंधन दिसत नाही...
आणि स्वातंत्र्य सांगणारा त्याला शत्रू वाटतो.” हे वास्तव आपण स्विकारतो आहोत .

तेव्हा बौद्धिक गुलामानो , वेळीच सावध व्हा... अन्यथा वेशीवर आलेली ही गुलामीची साखळी उंबरठ्याआत शिरायला वेळ लागणार नाही!"



भाजप प्रणीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या या राज्यात गुन्हेगार कसे शाही थाटात वावरतात आणि कोणतीही भीती न बाळगता आपली कृत्यं कशी पार पाडतात, हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ही घटना अपवाद नाही, तर पुनरावृत्ती झालेलीच  एक साखळी व नियोजन बद्ध  योजना आहे. आणि  यापूर्वीही अनेक प्रसंगांनी हेच सिद्ध केले आहे की सामान्य माणसाला राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

"हा देश गुलामांचा बनत  आहे" असे म्हणणे अतिशयोक्ती वाटू शकते, पण परिस्थिती पाहता यात काही  चुकीचेही वाटत नाही. 

“ज्याला प्रश्न विचारायची भीती वाटते, त्याने स्वतःला  गुलाम समजावंयला हरकत नसावी अशीच परिस्थिती सध्या आहे ”

म्हणूनच सामान्य माणसाने आता जागं होणं गरजेचं आहे. आपले खरे शत्रू कोण आहेत आणि खरे समाजधुरीण कोण, याची खरी ओळख करून घेणं ही आजची सर्वात मोठी गरज आहे.

संपूर्ण समाजासाठी चिंताजनक प्रश्न म्हणून बहुजन समाज ज्या लोकांवर विश्वास ठेवतो ती आपली लोकं कधीच नव्हती .हि गोष्ट नेमकी पडताळून आता तरी समाजाने सावध व सजग असणे गरजेचे आहे.



यापूर्वी महापुरुषांचा उघड अपमान करणारे भगतसिंग कोशारी कोण होते?

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांना ‘पळपुट्या’ म्हणणारे प्रकाश कोरटकर कोणाच्या  जवळचे आहेत?

हिंदुत्वाच्या नावावर मटन विकायला सांगणा रे  कोण आहेत?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर  संशय घेत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे राहुल सोलापूरकर कोण आहेत?

अवघ्या सहा महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो — यामागे नेमकी कोणती शक्ती काम करत आहेत?

छत्रपती संभाजीचं नाव स्वतःला  लावणारा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे गुरुजी  कोण आहे? 

या देशात 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारी विचारधारा आजही कोणत्या स्वरूपात जिवंत आहे?

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा नदीत बुडवणारे, आणि त्यांना सदेह वैकुंठाला गेले असे खोटे प्रचार करणारे कोण होते?

पंढरपूरच्या विठोबा मंदिरात संत नामदेवांना प्रवेश नाकारणारी व्यवस्था कोणत्या मानसिकतेतून निर्माण झाली?

विठ्ठल मंदिरात 

महात्मा गांधी, डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश — या सगळ्यांच्या हत्या कोणी घडवून आणल्या? आणि त्यामागे कोणते विचार सक्रिय होते?

आजही हीच मानसिकता नव्या स्वरूपात जिवंत आहे.
कधी राष्ट्रवादाच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर,कधी सुरक्षेच्या,संस्कृतीच्या  नावावर, तर कधी परंपरेच्या नावावर....

आता पुन्हा एकदा मुळात गुन्हेगार असलेल्या दीपक काटेचा 'शिवप्रेमी' म्हणून खोटा दिखावा, राजकीय गुंड आणि त्यांच्या समर्थनार्थ कार्यरत काही सरकार धार्जिण्या प्रसार  माध्यमांकडून केला जातोय..."या  प्रकरणावरून या लोंकाचा त्यांच्या संघटनाचा व पक्षाचा  खरा चेहरा पुन्हा पुन्हा नव्याने उघड होतो आहे .

प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणा-या दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलीय. अनेक वेगवेगळ्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. तसंच सख्ख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपाखाली दीपक काटेला शिक्षा देखील झालीय. दीपक काटे हा मुळचा इंदापूर तालुक्यातील सराटी गावाचा,सध्या इंदापुरात वास्तव्यास सख्ख्या चुलत भावाच्या हत्येच्याआरोपात दीपक काटे 7 ते 8 वर्षजेलमध्ये राहून आलाय 6 जानेवारी 2025 पुणे विमानतळावर काटेच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काडतूसं सापडले होते या प्रकरणात पोलिसांनी दीपक काटेला अटक देखील केली होती तुरुगांत असताना दीपक काटेनं दौंड, करमाळा परिसरात टोळ्या तयार करून खंडणी गोळा केल्याचा आरोप आहे . चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्षअसताना काटे हा भारतीय युवा मोर्चाचा पदाधिकारी होता हे विशेष !.

शिवाय घटनेच्या वेळी २० ते २५ जणाच्या जमावासह येऊन त्याने हि कृती केली हे व्हायरल व्हिडिओत स्पष्टपणे दिसते आहे मात्र  आरोप फक्त ७ लोकांवर आहे.

मग संघटीत गुन्हेगारीचा (मकोका) आरोप का नाही ? हे हिंदुत्वाच्या नावावर तथाकथित नैतिकता आणि पावित्र्य  गाजवतात ,त्याचवेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पदाधिकारी वा कार्यकर्ता म्हणून प्रोत्साहन दिलं जातं? शिवप्रेम, इतिहास, राष्ट्रवाद या नावाखाली सामाजिक द्वेष आणि हिंसा निर्माण करण्याची ही पद्धत आहे का?

 लक्षात घ्या 
शत्रू त्या लोकांमध्ये नाहीत जे वेगळ्या धर्माचे आहेत,
तर त्या मानसिकतेत आहेत जी प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करत असते.

आज जर बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, महिलावर्ग, प्रबुद्ध मध्यमवर्ग — हे सगळे जर पुन्हा एकदा एकवटले, तर ही गुलामीची साखळी सहज तोडता येईल.

ही लढाई फक्त दोन व्यक्तींमध्ये नाही, तर दोन विचारसरणींमध्ये आहे. एक विचार म्हणजे शिवशक्ती – विवेक, विज्ञान, समता आणि सत्यवाद, आणि दुसरी बाजू म्हणजे धर्माचा वापर करून हिंसा, द्वेष आणि सत्ता.

एक विचार, एक मशाल, एक जागर 
हीच खरी क्रांती आहे.

आता वेळ आली आहे की आपण 'नावापुरते लोकशाहीत' राहणं थांबवून, खर्‍या अर्थानं लोकशाहीचे नागरिक  बनू.

अशा कितीतरी घटना आपण अनुभवतो आहोत.

हे सर्व समजून, पाहूनही जर सामान्य माणूस पुन्हा पुन्हा याच सत्ताधाऱ्यांची गुलामी पत्करत  असेल, तर त्यांना जागं करणं सोपं असतं.
पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करणं — हाच खरा आव्हानात्मक प्रश्न आहे.

वेळ गेलेली नाही. या गुलामीच्या साखळ्या तोडण्यासाठी बहुजनांनी पुन्हा एकदा क्रांतीची मशाल हातात घेणं अत्यावश्यक आहे. 



जय जिजाऊ 

गजानन खंदारे 

प्रवक्ता संभाजी ब्रिगेड

वाशिम

डिस्क्लेमर (Disclaimer):


वरील लेखातील विचार, संदर्भ आणि विश्लेषण हे माझे वैयक्तिक अभ्यास, घटनांचा आकलन व संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक भूमिकेच्या अनुषंगाने मांडलेले आहेत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसून, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर जनजागृती करणे हेच यामागील उद्दिष्ट आहे. सत्य व संविधानिक विचारांवर आधारित अभिव्यक्तीचा मी आदर करतो आणि अ-सहमतांना वैचारिक संवादासाठी नेहमी खुले आमंत्रण आहे .


– गजानन खंदारे

जिल्हा प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, वाशिम



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व पेढ्यांचा मालक!

मुली व पालकांच्या या तिन अपेक्षा मुळे लग्न जुळत नाहीत