राज-समाजकारणातील हे दोन दादा नक्की आहेत तरी कोण ?

बहुजन विचार चळवळीतील काही नावे ही फक्त नावं नसतात – ती ध्वजासारखी फडकत असतात, ज्याखाली अनेक पिढ्यांचा संघर्ष, वेदना, आणि प्रेरणा एकवटलेली असते. त्यातलीच दोन नावं – प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आखरे . अलीकडेच अक्कलकोट येथे प्रविणदादांवर झालेला शाईफेक प्रकार – हा केवळ एका माणसावरचा हल्ला नव्हता. हा हल्ला होता एका विचारावर , एका चळवळीवर , आणि लोकशाहीत मतभेदाला उत्तर देण्याऐवजी तोंड दाबून बसवण्याच्या कुजक्या वृत्तीवर . अर्थात, ज्यांना विचारांच्या रणांगणात हरायची भीती असते, तेच अशा गलिच्छ पद्धती वापरतात. बहुजन विचार चळवळीतील अतिशय आदराने घेतली जाणारी दोन नावे .. प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आखरे अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर घडलेला शाईफेक प्रकार ही केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर एका विचारधारेवर कुजक्या विचार धारेतून घडलेली घटना. या घटनेने अनेकांना मनस्ताप दिला ., पण त्याहून मोठं आश्वासन देणारी बाब म्हणजे – आज त्या दोन झंझावातासारख्या नेतृत्वकर्त्यांची एकत्रित भेट झाली ती पुण्यात ! होय, आम्ही बोलतोय ते प्रविणदादा गायकवाड आणि मनोजदादा आ...