रस्ते बंद, जबाबदाऱ्या मोकळ्या – रिसोडच्या विकासाला खिंडार कोणी पाडले?


लोणी फाटा

रिसोड शहर सध्या गोंधळाच्या कचाट्यात सापडले आहे. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा, हातगाड्यांचा अडथळा, नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या गाड्या आणि त्यातून वाट काढणारे नागरिक – हे दृश्य रिसोडच्या अव्यवस्थेची साक्ष देते. व्यापारी आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर, विधान परिषद सदस्य भावना गवळी, आमदार अमित झनक, माजी मंत्री खासदार अनंतराव देशमुख यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली असूनही, वाहतूक नियंत्रण, अतिक्रमण निर्मूलन आणि नागरी सुविधांमध्ये का पिछाडीवर आहे? हा प्रश्न प्रत्येक रिसोडकराला भेडसावतोय!

 सर्व घटकांनी हातात हात घालण्याची गरज व प्रशासनाची जबाबदारी:

नगरपालिका आणि पोलिसांनी वाहतूक नियंत्रण, अतिक्रमण म्हणजे वाहतुकीच्या रस्त्या अस्ताव्यस्तुभ राहणारी वाहतूक.
 स्थानिक दुकानांचे फलक इत्यादी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. नो-पार्किंगचे उल्लंघन, रस्त्यांवरील अतिक्रमणे यावर कारवाई न झाल्यास कायद्याचा धाक राहणार नाही. असे म्हंटल्या पेक्षा सध्या रिसोड मध्ये धाक राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे

लोकप्रतिनिधींची कसोटी:

नेते निधी आणतात, योजना मंजूर करतात, पण त्या प्रत्यक्षात उतरल्या का? नागरिकांना त्याचा लाभ मिळाला का? याचा पाठपुरावा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. फक्त रिबन कापण्यापेक्षा कामाची गुणवत्ता तपासणे अधिक महत्त्वाचे.वाहतूक व्यवस्थे बाबत लोकप्रतिनिधींनी स्थानिक प्रशासनासोबत बैठका घेऊन किंवा पत्र व्यवहार करून त्यांचे लक्ष याकडे वेधून त्यांना त्यांच्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे 

नागरिकांचे कर्तव्य:

वाहतुकीचे नियम पाळणे, सार्वजनिक जागांचा आदर करणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जर आपणच नियम मोडले, तर प्रशासनाला दोष देणे कितपत योग्य?



विचार करा:   विकासाची व्याख्या फक्त जाहिरातबाजी आणि फलकांपुरती मर्यादित नाही
आपण फक्त निवडणुकीच्या वेळीच प्रश्न उपस्थित करतो का?निधी मिळवण्याची स्पर्धा आहे, पण त्याच्या वापराची पारदर्शकता का गायब आहे?

(बसस्थानक)

 रिसोडकरांसाठी हाक:


रिसोडला खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध, सक्षम आणि नागरिकाभिमुख शहर बनवायचे असेल, तर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विकासाचे श्रेय घेण्यापूर्वी, तो जनतेपर्यंत पोहोचतोय का, हे तपासणे गरजेचे आहे. रस्ते मोकळे करा, जबाबदाऱ्या पार पाडा – रिसोडचा खरा विकास तेव्हाच शक्य आहे!


कर्तव्य व जबाबदारीच्या दृष्टीने विश्लेषण खालील प्रमाणे करता येईल 
 (यात काही सूचना असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवावे )

1. स्थानिक प्रशासन (नगरपालिका):

अनधिकृत फेरीवाले, गाड्या आणि दुकानदार यांच्यावर कारवाई करून सार्वजनिक जागा मोकळी ठेवणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य आहे.

रस्त्यांची योग्य रचना, साइनबोर्ड्स, पार्किंग व्यवस्था आणि नो-पार्किंग झोन ठरवणे आवश्यक आहे.

2. पोलीस प्रशासन:

वाहतूक नियंत्रण, नियमबाह्य पार्किंगवर दंड, आणि वाहतूक सुसाट ठेवण्यासाठी गस्त वाढवणे हे पोलीसांचे जबाबदारीचे क्षेत्र आहे.

त्यांच्या दुर्लक्षामुळे कायदा तोडणाऱ्यांचे मनोबल वाढते आहे.

3. सामान्य नागरिक व व्यापारी वर्ग:

आपली जबाबदारी ओळखून रस्त्यावर अडथळा न निर्माण करणे.

सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळणे, वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने वाहन पार्क करणे ही सामाजिक जबाबदारी आहे

4. स्थानिक लोकप्रतिनिधी (नगरसेवक म्हणजे सध्याचे प्रशासक/आमदार):

लोकांच्या समस्या समजून प्रशासनावर दबाव आणणे आणि वाहतूक नियोजनात सुधारणा घडवून आणणे त्यांचे कर्तव्य आहे.

हे काम केवळ निधी मिळवणे नव्हे, तर शहराच्या अडचणींवर उपाय शोधणेही आहे.
---

📌 सुचना आणि उपाय:

1. संपूर्ण शहरात ‘नो-पार्किंग’ झोन स्पष्टपणे दर्शवावेत.

2. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करावेत.

3. साप्ताहिक पोलिस गस्त आणि स्पॉट फाइन मोहिमा राबवाव्यात.

4. शहरातील नागरिकांनीही सामूहिक जबाबदारीने या मोहिमेला पाठिंबा द्यावा.

5. वाहतूक सिग्नल, रस्ता खुणा, आणि वाहतूक संकेत यांचा योग्य वापर करावा.



© गजानन खंदारे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लग्न जुळेनात ! मुले म्हणतात अपेक्षा वाढल्या, मुली म्हणतात मुले बिघडली – खरं खोटं काय?"

फोन पे गुगल पे वापरताय सावधान ! भाजी विक्रेत्याला तब्बल 29 लाखाची GST नोटीस

पावसात गेली पिके, शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार समजून घ्या