गोल्डमेडडालिस्ट एम. डी डॉ ची तपासणी फी ५ रूपये
काही दिवसापूर्वी समाज माध्यमातून एक बातमी वाचनात आली. फोटोमध्ये भिंतीवर बसलेली व्यक्ती सामान्य कपडे परिधान करून, अनवाणी पाय, कागदाच्या तुकड्यावर काहीतरी लिहितो आहे. ज्याच्या कडे फक्त 3 रूपयांचा पेन आहे.
ती व्यक्ती आहे कर्नाटकातील मांदुआ येथील डॉक्टर शंकर गौडार कोलकाता मेडिकल युनिव्हर्सिटी चे गोल्डमेडलस्ट एमबीबीएस, एमडी.
त्याच्याकडे स्वत: चा दवाखाना नाही.
केबीन तयार करण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. एवढा पैसा कुठून आणणार
तो शहरापासून लांब दोन खोल्यांच्या घरात राहतो.
रूग्ण उपचारासाठी इतके दूर कसे येतील, म्हणून दररोज तो सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत शहरात एका फास्ट फूड रेस्टॉरंटच्या बाहेर बसतो
आणि शेकडो गरीब रूग्णांची तपासणी करतो. त्यांचे निदान करतो व स्वस्त, जेनेरिक औषधे लिहून देतो.
आणि एकीकडे वैद्यकीय व्यवसायाच्या नावाखाली लूट सुरू असताना तो आपल्या तपासणी फी चे फक्त पाच रुपये नाम मात्र शुल्क लोकांकडून घेतो
होय, फक्त ५ रुपये. गोल्डमेडलीस्ट एमडी पदवी असलेले डॉक्टर गरीब रूग्णांकडून फक्त ५ रुपये आकारतात.
आजच्या जगात जिथे डॉक्टर गरीब, सामान्य लोकांना अक्षरशः लुबाडत आहेत. तो अनेकांसाठी देव माणूस आहे.
अशा उदात्त माणवास अभिवादन.
© cluster-find
यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की लिहा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा