१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व पेढ्यांचा मालक!

१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व  सोन्याचा पेढ्यांचा मालक!

( प्रविण साखरकर मोप रिसोड)

दृष्टी ही प्रत्येकाकडेच असते ,परंतु नुसतीच दृष्टी असून चालत नाही तर त्यासाठी दृष्टिकोनही हवा असतो.  दृष्टिकोनातून जे कार्याची आखणी करतात तेच खरे Winner 🏆 असतात..

दुरदृष्टी, ध्येयनिष्ठा, आत्मविश्वास, अनुशासन, नियोजन, निर्णायकता ई गोष्टीवर तुमचे यश अवलंबून असते.    २००६ मध्ये माझी नोकरी गेली, आमची नोकरी नेमकी कुठल्या अवगुनाने गेली. याबाबत तर्क सांगणारे अनेक जण त्यावेळीही होतेच.

चांगल्या आणि वाईट गोष्टीची चिकित्सा सांगणारा समाज आपल्या चहुबाजूनी पेरलेला असतोच असतो.

"अशातच पत्रकारितेचे  दगडं अंगावर झेलत असताना निर्वाहासाठी मी ट्युशन कम टेन्शन घेत होतो."

मांडवा शाळेला नुकतेच ज्युनिअर कॉलेज सुरू झाले होते

मांडवा शाळेची काही शिक्षक मंडळी माझ्याकडे आली. मी ११ वी १२ वी ला गणित विषय शिकवावा असा आग्रह त्यांनी धरला. त्या बदल्यात १०००/ रू मिळणार. मी पत्रकारितेत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही मार्गाने या  पेक्षा जास्त कितीतरी जास्त कमवत होतो.

मला परवडणार नाही म्हणून मी नकार दिला. "तुमच्या नजरेत एखादा चांगला व्यक्ती असेल तर सांगा" 

शिक्षक बोलले. 

गरिबीचा चिंध्या पांघरून प्रवीण त्यावेळी खाजगी क्लासेस वर जगण्यासाठीचा संघर्ष मांडत होता.

 part-time आधार होईल म्हणून प्रविणने मांडवा शाळेचा जॉब स्वीकारला.   मात्र आयुष्यात काहीतरी बनायचं स्वप्न असेल तर अशावेळी

 it is important to keep the goal in ur mind.. 

मोठ व्हायचं स्वप्न उराशी बाळगून प्रवीण  हार्ड वर्क करत होता. २०११ मध्ये वाकद सारख्या ठिकाणी स्वतःची कोचिंग सुरू केले. यश-अपयश आर्थिक अडचणी सतत पाठशिवणीचा खेळ खेळत असताना,"जिद्द आणि धडपड मात्र कायम होती" त्यातून बाल शिवाजीची स्थापना झाली .

ही शाळा बघता बघता नावा रूपाला आली. रिसोड तालुक्यात बाल शिवाजी च्या नावाची चर्चा व्हायला लागली. लॉक डाऊन च्या कठीण काळात अनेक शाळा कंबर मोडून पडल्या असताना बाल शिवाजी मात्र अजूनही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत मोठ्या लौकिकाला येत आहे. 

लहान  भावाचं पंकजच लग्न झालं त्यावेळी मोप सारखे ग्रामीण ठिकाणी रिसेप्शन ला सर्वांसाठी  "बफे "जेवण ठेवणारा प्रवीण साखरकर हा गावातील पहिला व्यक्ती... 

पिढीजात सोनाराचा धंदा असावा म्हणून रिसोड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी जागा मिळवणे सोपे नसताना स्वतःची सुवर्ण अलंकार पिढी स्थापन केली सध्या प्रवीणची सोन्या चांदीचे दोन दुकाने आहेत . व दोन नामांकित शाळा आहेत.अजूनही तो अविरत संघर्ष करतोय एवढा पसारा सांभाळणे म्हणजे, पान टपरीवर, चौकात बसून दुसऱ्याच्या खपल्या काढण्यात इतके सोपे नक्कीच नाही. .. प्रवीणच्या या जिद्दीला व मेहनतीला आमचा सलाम.    🙏🙏🙏🙏


गजानन खंदारे रिसोड.   














सर्व फोटो सौजन्य: प्रविण साखरकर

Disclaimer

इतरांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे हा या मजकुलाचा उद्देश आहे.

आपणही आपल्या संग्रही असलेल्या आठवणी, प्रेरक गोष्टी आमच्या पर्यंत कळवा







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुली व पालकांच्या या तिन अपेक्षा मुळे लग्न जुळत नाहीत