पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व पेढ्यांचा मालक!

इमेज
१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व  सोन्याचा पेढ्यांचा मालक! ( प्रविण साखरकर मोप रिसोड) दृष्टी ही प्रत्येकाकडेच असते , परंतु नुसतीच दृष्टी असून चालत नाही तर त्यासाठी दृष्टिकोनही हवा असतो.  दृष्टिकोनातून जे कार्याची आखणी करतात तेच खरे Winner 🏆 असतात.. दुरदृष्टी, ध्येयनिष्ठा, आत्मविश्वास, अनुशासन, नियोजन, निर्णायकता ई गोष्टीवर तुमचे यश अवलंबून असते.    २००६ मध्ये माझी नोकरी गेली,  आमची नोकरी नेमकी कुठल्या  अवगुनाने   गेली. याबाबत तर्क सांगणारे अनेक जण त्यावेळीही होतेच. चांगल्या आणि वाईट गोष्टीची चिकित्सा सांगणारा समाज आपल्या चहुबाजूनी पेरलेला असतोच असतो. "अशातच पत्रकारितेचे  दगडं अंगावर झेलत असताना निर्वाहासाठी मी ट्युशन कम टेन्शन घेत होतो." मांडवा शाळेला नुकतेच ज्युनिअर कॉलेज सुरू झाले होते मांडवा शाळेची काही शिक्षक मंडळी माझ्याकडे आली. मी ११ वी १२ वी ला गणित विषय शिकवावा असा आग्रह त्यांनी धरला. त्या बदल्यात १०००/ रू मिळणार. मी पत्रकारितेत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही मार्गाने  या   पेक्षा जास्त कितीतरी जास्त कमवत होतो. मला परवडणार...